जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आकाश प्लास्टिक कंपनीत शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत कच्चा माल व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरूवार २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील जी -सेक्टर मधील आकाश प्लास्टिक कंपनीत सोमवारी १७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतील शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक बनविण्याचा कच्चा माल आणि मशिनरी जळून खाक झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पथकाने अथक परिश्रम घेतल्याने आग विझविण्यात आली. या आगीत अंदाजे २० लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. खंडू किसन पवार रा. अयोध्या नगर, जळगाव यांच्या खबरीवरून गुरूवार २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.