लग्न जमवून देण्याच्या आमिषाने भोंदु बाबाकडून फसवणूक

 

पाचोरा, प्रतिनिधी  । पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील उपवर तरुणाची एका मध्यस्थ कथित महाराजाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पाचोरा पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

फसवणूक करणाऱ्या भोंदु बाबाची दुसखेडा (ता. पाचोरा ) येथील भावी नवरदेवाची चुलत बहिण असलेल्या जामनेर तालुक्यातील  पळासखेड (गुजराचे) येथील चुलत बहिणीशी दोन वर्षांपासून ओळख होती. तिच्या घरी त्याचे येणे – जाणे असल्याने मी लग्न जुळविण्याचे काम करतो असे सांगितल्यानंतर तिने माझा दुसखेडा येथील चुलत भावाचा विवाह करायचा असल्याचे सांगितल्यानंतर भोंदु बाबाने पंढरपूर येथे माझ्या ओळखीतील एक मुलगी असुन तिचा विवाह करायचा आहे. मात्र तिला विवाहात दागिणे घेण्यासाठी दिड लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले

 

भोंदू बाबाने  दुसखेडा येथे येऊन नवरदेवाचे काकांशी संपर्क केल्यानंतर ठरल्याप्रमाणे २२ जुनरोजी विवाह निश्चित झाला. दरम्यान भोंदु बाबाने दिड लाख रुपये रोख ताब्यात घेतले. सद्यस्थितीत मुलांना मुली भेटत नसल्याने दुसखेडा येथील ३२ वर्षाच्या युवकाने प्रत्यक्षात मुलगी न पाहताच आशेपोटी दिड लाख रुपये भोंदु बाबाकडे देवुन टाकले. अखेर २१ जुन  उजाडला रितीरिवाजा प्रमाणे हळदीचाही कार्यक्रम उरकला.

 

नवरी मुलगी २२ जुनला दुसखेडा येथे सकाळी येणार असे भोंदु बाबाने सांगितलेले असल्याने नवऱ्या मुलाकडे विवाहासाठी सर्व आप्तेष्ट जमा झाले. विवाहासाठी जेवणावळी तयार झाली. २२ जुनला पहाटे चार वाजेपासून नवरी मुलगी आणण्यासाठी भोंदु बाबास भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता भोंदु बाबाचा भ्रमणध्वनी नाॅट रिचेबल येवु लागला. मग नवरदेवाकडील मंडळींची चिंता वाढु लागली. दुपार नंतर भोंदु बाबाचा भ्रमणध्वनी लागत नाही व नवरी मुलगी ही येत नाही अशी खात्री पटल्यानंतर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने त्याने पोलिसात धाव घेतली.

 

राजेश्वर नारायण पाटील हा जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजरांचे या गावातील रहिवासी असून तो मुला मुलींचे लग्न जमवून देण्याचे काम करतो. पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील उपवर तरुण रविंद्र प्रकाश पाटील याच्या व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर राजेश्वर पाटील याने एका तरुणीचा फोटो पाठवला. तुला ही मुलगी आवडल्यास मी तुझे लग्न या मुलीसोबत लावून देतो असे राजेश्वर पाटील याने उपवर रविंद्र पाटील यास म्हटले. मुलगी आवडल्यामुळे व राजेश्वर पाटील याच्या बोलण्यावर विश्वास बसल्यामुळे ठरल्यानुसार रविंद्र पाटील याने राजेश्वर पाटील यास दिड लाख रुपये दिले. मुलगी न बघताच व्हाटस अ‍ॅपवर पाठवलेल्या तरुणीसोबत २२ जून रोजी लग्नाचे आयोजन करण्यात आले.

 

नवरी मुलगी राजेश्वर पाटील घेऊन येणार असल्याचे ठरल्यामुळे इकडे नवरदेवाच्या रुपातील रविंद्र्च्या अंगाला हळद लावण्यात आली होती. मात्र नंतर लग्न जमवणा-या मध्यस्त राजेश्वर पाटील याने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करुन ठेवला. इकडे लग्नासाठी आलेली मंडळी नववधूची वाट बघत दमले. शेवटी आपली फसवणूक झाली असल्याचे नवरदेवाच्या रुपातील रविंद्र पाटील याच्यासह सर्व व-हाडींच्या लक्षात आले  दरम्यान भोंदु बाबा शेवाळे (ता. पाचोरा) येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी शेवाळे येथे जावुन भोंदु बाबा शेवाळे येथेच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी माहिती दिली.

 

राजेश्वर नारायण पाटील याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेश्वर हा फेसबुकवरुन मुलींचे फोटो डाऊनलोड करुन फसवणूक करत असल्याचे तपासात उघड होत आहे. ४ जुलै रोजी दुपारी राजेश्वर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश पाटील हे पुढील तपास करीत आहेत . भोंदु बाबा राजेश्वर पाटील यांचेकडुन अशा प्रकारे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

Protected Content