Home Cities धरणगाव एनएमएमएस परीक्षेत पी.आर.हायस्कूलची विद्यार्थिनी पल्लवी सोनवणे जिल्ह्यात तिसरी

एनएमएमएस परीक्षेत पी.आर.हायस्कूलची विद्यार्थिनी पल्लवी सोनवणे जिल्ह्यात तिसरी


 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलची विद्यार्थिनी कु.पल्लवी दिपक सोनवणे ही राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुसूचित जाती (एससी) गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कु. पल्लवी ही अतिशय गुणी विद्यार्थिनी असून तिला वक्तृत्व, नृत्य, नाटक, कथा, कविता लेखनात विशेष गोडी आहे. त्यासाठी तिलाअनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

 

पल्लवीच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष व्ही.टी.गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया,मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, उपमुख्याध्यापक एस.एम. अमृतकर, पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे, वर्गशिक्षक एन.आर. सपकाळे व जी.आर सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound