वनोली येथे रेशनचा घोळ; रेशन दुकानदाराकडून आत्महत्येची धमकी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वनोली येथील रेशन दुकानात धान्य वाटपाबाबत घोळ होत असल्याने ग्रामस्तरीय समितीने जाब विचारला असता रेशनदुकानदाराने अश्लिल शिवीगाळ करून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी नागरीकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील वनोली येथील रेशनिंग दुकान नंबर ७९ अंबादास धनसिंग पाटील यांचे नावे रेशनिंग दुकान आहे. शासनाने कोरोनामुळे मोफत तांदूळ वाटप सुरु केले असून त्या अनुषंगाने वनोली गावामध्ये ही मोफत धान्य वाटप सुरु आहे. शासनाने नेमून दिलेली कमिटी देखील धान्य वाटप ठिकाणी उपस्थित होती. सदर धान्य दुकानदार यांना पाँश मशीनप्रमाणे धान्य वितरित करण्याचे आदेश शासनाने दिलेली आहे. परंतु सदर वाटप करत असताना आर.सी. १२ अंकी नंबर ऑनलाइन साईटवर टाकले असता नागरीकांच्या लक्षात आले. कार्डावर जरी ४ नावे दिसत असली तरी आँनलाईन पॉज मशीनमध्ये ८ नावे दिसत आहे व सदर नावाप्रमाणे धान्य मिळत नसल्याने नागरिकांनी ग्रामस्तरीय समितीच्या लक्षात हा सारा प्रकार आणून दिला. समितीने रेशनिंग दुकानदार अंबादास पाटील यांना पाँश मशीनने धान्य वाटप करण्याच्या सूचना केल्या असता रेशनिंग दुकानदार अंबादास पाटील यांनी समिती सदस्याशी अश्लील अर्वाच भाषेतबोलून शिवीगाळ केली आहे. तसेच धमकी दिली की, ‘तुमचे कायम माझ्याशी काम आहे व हे धान्य फक्त एक महिना मिळणार आहे’ असे सर्वांना बजावले. आज २१ रोजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या समोर आत्महत्या करतो अशी धमकी दिली, असे निवेदन वनोलीकरांनी येथील नागरीकांनी यावल तहसिलदार यांना दिले आहे. निवेदनावर ३० ते ३२ नागरिकांच्या सह्या आहेत त्या अनुषंगाने आज २१ रोजी यावल नायब तहसीलदार बामणोद मंडल अधिकारी वनोली तलाठी यांनी वनोली गावामध्ये येऊन रेशन दुकानदार यांची चौकशी केली व नागरिकांचे जाबजबाब घेतले आहे.पुढील कार्यवाही काय होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Protected Content