एनआरसी देशभरात लागू करण्याचा अद्याप कोणताही निर्णय नाही ; गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती

nrc

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रिया देशभरात लागू करण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. लोकसभेत लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.

 

संसदेत सुधारित नागरिकत्व विधेयक मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार सरकार आधी नागरिकत्व कायदा आणणार आणि त्यानंतर एनआरसी असं सांगितलं होतं. यानंतर देशभरात तसंच अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. दिल्ली आणि इतर काही भागांमध्ये गेल्या महिन्यापासून सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरु आहे. परंतू एनआरसी देशभरात लागू करण्याची कोणती योजना आहे का? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आल्यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तर देत सांगितले की, सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर एनआरसी प्रक्रिया लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. यावेळी गृहमंत्रालयाने एनआरसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही असेही सांगितले. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देश सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे.

Protected Content