आरोप कबूल करण्यासाठी पाकिस्तानकडून कुलभूषण यांच्यावर दबाव

images

इस्लामाबाद, वृत्तसंस्था | पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानकडून प्रचंड दबाव आणला जात आहे. पाकिस्तानचे खोटे आरोप कबूल करण्यासाठी कुलभूषण यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा भारताने केला आहे. दरम्यान कुलभूषण यांच्या अटकेनंतर तब्बल तीन वर्षांनी पाकिस्तानने पहिल्यांदाच त्यांना कौन्सिलर अॅक्सेस दिला आहे.

 

पाकिस्तानातील भारताचे डेप्युटी हाय कमिश्नर गौरव अहलुवालिया यांनी आज इस्लामाबादमध्ये कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. अहलुवालिया यांच्या या भेटीनंतर भारताने पाकिस्तानवर घणाघाती हल्ला चढवला आहे. पाकिस्तान कुलभूषण यांच्यावर दबाव आणत आहे. खोटे आरोप मान्य करण्यासाठी हा दबाव आणला जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनाही एक तास उशिराने कुलभूषण यांची भेट घडवून आणण्यात आली. भेटीचे ठिकाणही पाकिस्तानने ऐनवेळी बदलले असल्याचे भारताने म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून विस्तृत अहवाल मिळाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, कुलभूषण यांच्या आईलाही या भेटीची माहिती देण्यात आली आहे.

Protected Content