एकाच मोबाईल क्रमांकावरून तयार करा संपूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । आधार कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर देण्याची गरज नाही. केवळ एका मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड बनवता येईल

आधारमध्ये नोंदविलेले मोबाईल नंबर विचारात न घेता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणताही मोबाईल नंबर वापरून कोणत्याही ओटीपीची मागणी करू शकतो. याअंतर्गत केवळ एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकते.

या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च करावे लागतील. हे कार्ड अगदी एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे आहे. जेणेकरून आपण ते सहजपणे आपल्या पाकिटात ठेवू शकता.

घरी बसून पीव्हीसी बनलेले आधार कार्ड मिळवायचे असेल तर प्रथम आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे माझा आधार नावाच्या विभागात क्लिक करून आपल्याला नवीन आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल. नंतर आपला १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. सुरक्षा कोड भरा, कॅप्चा योग्यरित्या भरा आणि सेंट ओटीपी वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. हे ओटीपी जोडल्यास पीव्हीसीसह आपले आधार कार्ड प्राप्त होईल. त्यानंतर ५० रुपयांचे पेमेंट ऑनलाईन जमा करावे लागेल. पेमेंट प्रक्रिया पूर्ण होताच, आपला नवीन आधार ५ दिवसांत आपल्या घरी पोहोचेल.

Protected Content