उर्वरित सर्कलला नुकसानीचे अनुदानासाठी आ. पाटलांची राज्यस्तरावर सकारात्मक चर्चा

पारोळा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान उर्वरित सर्कलला मिळावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली असता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आयोजित बैठकीत यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

 

सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२१ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. असे असतांना माझ्या मतदारसंघातील एरंडोल तालुक्यातील फक्त एकाच सर्कलला अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले असून उर्वरित ३ सर्कलला अनुदान मंजूर नाही. तसेच पारोळा तालुक्यातील दोन सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आले असून उर्वरित ३ सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही. तसेच संपूर्ण एरंडोल व पारोळा तालुक्यात नुकसान झालेले असतांना व पंचनामे झालेले असूनही उर्वरित पारोळा तालुक्यातील तीन व एरंडोल तालुक्यातील तीन सर्कलला अनुदान मंजूर नसल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अनुदान मिळणेबाबत सातत्याने मागणी होत आहे.

यास्तव उर्वरित सर्कल मधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्याबाबत आपल्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात यावी व उर्वरित सर्कलला तातडीने अनुदान मंजूर होणेसाठी योग्य तो निर्णय व्हावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे , मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार , जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे २३ मार्च २०२२ रोजी पत्रान्वये केलेली होती. याचा सातत्याने पाठपुरावा आमदार चिमणराव पाटील हे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी करीत होते. आमदार पाटील यांच्या योग्य पाठपुराव्याला व प्रयत्नांना यश आले असून उपरोक्त मागणीची मंत्री महोदयांनी दखल घेत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळण्यासंदर्भात तातडीचे बैठक आज दि.२६ एप्रिल २०२२ रोजी मुंबई येथे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली ,कृषिमंत्री दादा भुसे व आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन, प्रधान सचिव, कृषी, विभागीय आयुक्त, नाशिक, जिल्हाधिकारी, जळगाव, जिल्हा कृषि अधिकारी, जळगाव यांचे समवेत घेण्यात आली.या बैठकीत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान उर्वरित सर्कलला मिळण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

Protected Content