मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे मी प्रांजाळपणे कबुल करते, ती म्हणणाऱ्यांचा मी आदर करते. जरूर म्हणावं. मात्र, इतरांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालिसा म्हणणं योग्य नाही,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
“चार मतं कमी पडली तरी चालेल, पण माझं माझ्या राज्यावर, देशावर प्रेम आहे, तर मी धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीच करणार नाही. सगळंच मतांच्या राजकारणासाठी करू नये.” असं म्हणत आपल्या धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजे हे असं मत त्यांनी व्यक्त केलं. सुप्रिया सुळे ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना; ‘पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी धार्मिक गोष्टींवर राजकारण होत असल्याबद्दल’ त्यांनी टीकास्त्र सोडलं.