भुसावळात रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीच्या सहकार्याने शंभर झाडांची लागवड (व्हिडिओ)

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या सुमारे शंभर झाडे लागवडीचा शुभारंभ  सनांसे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. 

ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्माण करणारी झाडांची कमतरता पाहून रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीच्या पुढाकाराने निळकंठ नामदेव सनंसे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकार्याने परिसरात ऑक्सीजन निर्मिती करणारे झाडे जसे की वड पिंपळ औदुंबर जांभूळ कडूनिंब अशा सुमारे शंभर झाडांची लागवडीचा शुभारंभ  सनांसे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर बी. एच. चाकूरकर उपस्थित होते.  यापूर्वी देखील रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली मार्फत ग्रामीण रुग्णालयासाठी सुमारे दोन लाख खर्च करून ४० बेडसाठी ऑक्सिजन प्रणालीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर हा वृक्ष रोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे हा परिसर प्रदूषण रहित व सुंदर होईल यासाठी डॉ. चाकूरकर यांनी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे आभार मानले.  लावलेली झाडे जगवण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती पाण्याची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली मार्फत करण्यात आली आहे.  झाडे जगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे यावेळी रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष सुधाकर सनान्से यांनी सांगितले. यावेळी किशोर पाचपांडे,  विजय आंबेकर, सुखदेव भारुडे,  डॉ.  सिद्धेश पाटील,  अजय अंबेकर, डॉ. प्राजक्ता तळेले, मनोज भोईटे, शेखर आंबेकर, इलियास शेख, वेदांत सनांसे, राहुल आंबेकर उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1922445687914339

 

Protected Content