उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपींची देवाण-घेवाण

 

भुसावळ : प्रतिनिधी । येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात घरफोडीच्या आरोपींची देवाण-घेवाण करून रेकॉड वरील गुन्ह्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

दि ६ फेब्रुवारी २०२१ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशन ,तालुका पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीतील ५२ आरोपींची देवाण-घेवाण करण्याकामी दुपारी ४.०० वाजेला बोलविण्यात आले होते. त्यापैकी १४ आरोपी उपविभिगीय पोलीस अधिकारी कार्यालयात हजर राहून त्यांची देवाण- घेवाण करण्यात आली. घरफोडीतील बाकी आरोपींची माहिती संकलन केली असता उर्वरित आरोपी बाहेर गावी असल्याचे निदर्शनास आले.

“क्राईम मिटिंग” मध्ये हजर असलेले १४ आरोपीकडून फॉर्म भरून त्यांचा अलबम तयार करण्यात आला.तसेच रेकॉड वरील आरोपींवर गुन्हे घडल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.तिघे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपविभागात १४ आरोपींपैकी यातील नवीन गुन्हेगारांनी यापुढे घरफोडी केल्यास त्यांची जामीन लवकर होवू देणार नाही अश्या सूचना दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की आजच्या “क्राईम मिटिंग” मुळे मागील झालेल्या दोन घडफोड्या लवकरच उघडकीस येण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे, रामकृष्ण कुंभार यांची मिटिंगला उपस्थिती होती.

Protected Content