जळगाव, सचिन गोसावी । उपमहापौर कुलभूषण पाटील व त्यांच्या कुटुंबियांवर झालेला हल्ल्याने शांतता प्रिय शहर असा जळगावचा असलेला नावलौकिक धुळीस मिळाला आहे. या हल्ल्याची कसून चौकशी करून संशयीत आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना केली.
निवेदनाचा आशय असा की, इतर काही महानगराप्रामाणे जळगावात देखील गोळीबार होऊ लागल्याची आणि एका लोकप्रतिनिधी प्राणघातक हल्ला होण्याची ही बाब अतिशय गंभीर आहे. यामुळे पिंपळा परिसर आणि संपूर्ण जळगाव शहरात जनतेत घबराट पसरली आहे. टोळी युद्धामध्ये गुंडाकरवी बंदुकी सारखीशस्त्र वापरण्यात आल्याच्या घटना अन्य महानगरात घडलेल्या आहेत. मात्र जळगावात चक्क एका जबाबदार लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्यात आला आहे, या घटनेमुळे आम्हा लोकप्रतिनिधीमध्ये देखील दहशतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. सर्व हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी असी मागणी करण्यात आली. . याप्रसंगी नगरसेविका सुरेखा सोनवणे, प्रतिभा देशमुख, पार्वताबाई भिल, ज्योती चव्हाण, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, सचिन पाटील, चेतन सनकत, अॅड. दिलीप पोकळे, किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते.
महापौर जयश्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी समाजविघातक प्रवृत्तीने प्राणघात हल्ला झाला. या प्रवृत्तीला आळा घालावा. लोकप्रतिनिधी हे जळगाव शहराचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जळगाव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्री-अपरात्री त्यांच्यापर्यंत पोहचावे लागते. मात्र, लोकप्रतिनिधीच जर सुरक्षित नसतील तर नागरिकांच्या सुरक्षा कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित करत उपमहापौर पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2974884552724169