जळगाव,प्रतिनिधी वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरात असलेल्या सर्व कोविड सेंटर ची आज पाहणी करून विविध सूचना दिल्यात.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कोविड सेंटर भेट दिली असता तेथील अनेक खाटा या रिकाम्या असल्याचे त्यांना आढळू आले. यात शासकीय तंत्रानिकेत महाविद्यालय, महापालिकेचे कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर तसेच शहरातील इतर कोविड केअर सेंटर्सचा ही समावेश आहे. कोविड केअर सेंटरची पाहणी केल्यानंतर उपमहापौर पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन महाविद्यालयातील असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने महाविद्यालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सची माहिती घेतली. यावेळी मनपा चे आरोग्य अधिकारी डॉ.राम रावलानी, महिला बालविकास समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक प्रा. सचिन पाटील , नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, रेश्मा काळे , प्रतिभा देशमुख , चेतन सनकत , प्रतिभा पाटील , किशोर बाविस्कर आदींची उपस्थिती होती.
उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी लक्षण असणारे, लक्षणे नसणारे सर्वच रुग्णांवर शासकीय नियमांनुसार कोविड केअर सेंटर मध्येच उपचार करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. यानंतर कोणत्याही रुग्णाला होम आयसोलेट होता येणार नाही, असं ही ते यावेळी म्हणाले. तसेच यापुढे शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर स्वतः महापौर व उपमहापौर रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहे असा इशारा ही उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी दिला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/875525023304598