जळगाव, प्रतिनिधी । उपमहापौर सुनिल खडके यांनी आज प्रभाग समिती क्रमांक २ च्या कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी प्रभागांतर्गत मनपाच्या विविध विभागांच्या प्रमखांची आढावा बैठकही घेण्यात आली.
उपमहापौर आपल्या दारी या अभियानांतर्गत प्रभाग समिती अंतर्गत पुर्णत: किंवा अशंत: येणाऱ्या वार्ड क्रं. ३,४,१५,१६,१७ मधुन प्राप्त तक्रारींतील बहुतांशी तक्रारींचा निपटारा झाला आहे. उपमहापौर यांच्या सोबत प्रभाग समिती सभापती मनोज आहुजा यांच्यासह महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. रंजना भरत सपकाळे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, स्थानिक नगरसेविका रेश्मा कुंदन काळे, प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्यांवर खड्डे चाऱ्या खोदल्याने त्यात अनेक जण पडल्याच्या तक्रारी आढावा बैठकीत करण्यात आल्या. अमृत जल योजना, भुमिगत गटारी इत्यादी खोदकामामुळे प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या विविध कॉलन्या वसतीमुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण झालेले आहेत. याबाबत काम होताच खड्डे चाऱ्या बुजून दुरुस्त करण्याचे निर्देश दोन्ही मक्तेदारांच्या प्रभागांतर्गत प्रतिनिधींना देण्यात आले.
उपमहापौरांनी आढावा बैठकीनंतर प्रभाग समिती कार्यालयाची पाहणी केली तसेच कर्मचारी वर्गाशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. प्रभाग समितीत किमान १ लेखनिक आणि दोन संगणक चालक कर्मचारी यांची कमतरता असल्याचे यावेळी आढळुन आले. त्याबाबत प्रशासन विभागाला निर्देश देण्याचे आश्वासन उपमहापौरांनी यावेळी दिले. भेटीवर आलेल्या उपमहापौरांची यावेळी काही नागरीकांनी भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या तक्रारींबाबत म्हणणे मांडले नव्याने येणाऱ्या या तक्ररीही नोंदुन घेण्यात आल्या आहेत.