चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उपखेड येथील एका दिव्यांग बांधवास वर्धमान भाऊ मित्र परिवाराच्या वतीने तीन चाकी सायकल भेट देण्यात आली आहे. यामुळे त्याला सायकलीच्या सहाय्याने गावात व्यवसाय करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील श्रावण हिलाल वाघ या दिव्यांग बांधवास आज वर्धमान भाऊ मित्र परिवाराच्या वतीने त्याच्या मागणीनुसार व गरजेनुसार तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. त्यामुळे या सायकलीमुळे त्याला गावात फिरून आपला व्यवसाय करता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तत्पूर्वी यावेळी उपखेड येथील सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, विजय गवळी, गणेश गवळी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान याप्रसंगी बोलताना वर्धमान धाडीवाल यांनी उपखेड गावातील आणखीनही काही गरजू लोक असतील तर त्यांना त्यांच्या गरजेनुसार आपण आवश्यक ती मदत करू असे सांगितले. तसेच गावात जर अनाथ मुली असतील तर त्यांच्या लग्नासाठीही आपण सर्व प्रकारची मदत करू असे यावेळी उपस्थितांना सांगितले. त्याचबरोबर दिलीप घोरपडे यांनी वर्धमान भाऊ मित्र परिवार करीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली.
यावेळी माजी सरपंच प्रभाकर भास्कर मगर, ग्रामसेवक सुभाष गुलाब राठोड, लोकेश्वर दिनकर निकम, सुभाष देवराम पाटील, संदीप अजबराव मगर, रवींद्र गोरख मगर, सुरेश विश्वास पाटील, चेतन रवींद्र मगर, वना अमृत कोळी, नंदकुमार रामकृष्ण मगर, अविनाश मुरलीधर मगर, कैलास गंभीर मगर, प्रल्हाद शेनपडू कुंभार, दिनकर माणिक मगर व प्रभाकर रामराव पाटील आदी उपस्थित होते.