जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत.
देशात कोरोनाच्या विषाणूजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकवीस दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. भारताने या महामारीच्या विरोधात केलेल्या उपाययोजना जगात अधिक प्रभावी ठरली आहे. या देशव्यापी लॉकडाऊन काळात नागरिकांच्या सोयी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारने करोनाशी मुकाबला करण्यासाठी कंबर कसली असून आज केंद्रीय पेट्रोलीयम प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपली जबाबदारी निभावत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटींची मदत केंद्र सरकारकडे जमा केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००