उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन

रावेर प्रतिनिधी ।  उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दि २६ रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

नेहमी सामाजिक कामांमध्ये सक्रीय असणारे तसेच वेळो-वेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना  जवळुन पदरमोड करून मदत करणारे उद्योजक श्रीराम पाटील यांचा दि २६ गुरुवार रोजी वाढदिवस साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुक्यातील रुग्णासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले येणार आहे. तसेच एमपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या मुलांना पुस्तकांचे किट्स वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम श्रीरामदादा मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला असून मॅक्रो व्हिजन अँकडमी सावदा रोड येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

पालकमंत्र्याची असणार प्रमुख उपस्थिती

दरम्यान श्रीरामदादा मित्र परिवारा तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,माजी मंत्री एकनाथराव खडसे,गिरीष महाजन, झेडपी अध्यक्ष रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे आदी लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहे.

 

Protected Content