कोळवद विकास सोसायटीतील तीन संचालक अपात्र ; चर्चेला उधाण

यावल – लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तीन संचालकांवर दुसऱ्या संस्थेची चौकशीतील जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याने या तिघ संचालकांना यावल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल जे. बी. बारी यांनी अपात्र घोषित केल्याने सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

कोळवद तालुका यावल विविध कार्य सहकारी सोसायटीच्या मार्च२०२२च्या साधारण ९ महीन्यापुर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिल प्रल्हाद पाटील शशिकांत नारायण चौधरी हे सर्वसाधारण मतदारसंघातून तर अनिल रामचंद्र महाजन हे इतर मागास मतदारसंघातून निवडून आलेले होते ,तिघेजण धनलक्ष्मी फळ भाजीपाला विक्री सहकारी सोसायटी लिमिटेड कोळ्वद तालुका यावल या संस्थेच्या संचालक मंडळावर कार्यरत होते या ठिकाणी पद्माकर बळीराम महाजन ,प्रल्हाद डालू चौधरी ,केवल दास नथू चौधरी यांनी वरील तिघांविरुद्ध चौकशी मध्ये जबाबदारी निश्चित मध्ये नाव आल्याने तिघांचे संचालकपद रद्द करण्यात यावे अशी तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांच्याकडे केली होती त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६oचे कलम ७३ क अ तीन अन्वये अधिकाराचा वापर करून तिघे संचालक यांनी अपात्र धारण केली असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ प्रमाणे त्यांना व्यवस्थापकीय समिती वरून निष प्रभावित करण्यात आल्याचा निर्वाळा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल जे बी बारी यांनी १७ ऑक्टोबर २०२२रोजी दिल्याने यावल तालुक्यात सहकार क्षेत्रात एकच चर्चा रंगु लागली आहे.

कोळवद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तिघं संचालकांची संपर्क साधला असता मागील निवडणुकीत समोरच्या पॅनलचा दणदणीत पराभव झाला होता मतदारांनी त्यांना साफ नाकारलेलं होतं राजकीय द्वेषापोटी पराभवाचा वचपा काढण्याच्या हेतूने काय म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घातले न्याय देवतावर आपला विश्वास असून वरिष्ठ स्तरावर आम्हाला निश्चित न्याय मिळेल त्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडे आपण दाद मागणार आहे असे अपात्र झालेले अनिल महाजन ,अनिल पाटील, शशिकांत चौधरी या तिघ संचालकांनी म्हटले आहे .

 

 

Protected Content