नशिराबाद- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नशिराबाद गावातील नागरिकांना रेशनकार्ड व १२ अंकी क्रमांक वाटप कार्यक्रमाचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
रेशनकार्ड संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गेल्या जुलै २०२१ पासून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश आले आहे. नशिराबाद गावातील सुमारे १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड बनवून देण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला यश आले आहे. तसेच ९५०५ लोकांना १२ अंकी ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून ४७२५० किलो धान्य नशिराबाद गावासाठी मंजूर करण्यात आले. कुटुंबांचे नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वाढविण्यात व कमी करण्यात पार्टीच्या कार्यकर्त्यांना यश आले. वर्षानुवर्षांपासून रेशनकार्ड संबधित समस्या लोकांना भेडसावत होत्या. या समस्या सोडवितांना नागरिक अनेक अडचणींना तोंड देत होते. त्यावर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत होती. पैसे घेऊनही काम होत नव्हती. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने तहसीलदार जळगाव यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनापर्यंतची मुदत देण्यात आली. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी नशिराबाद ते जळगाव तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत जात दांडी मार्च आंदोलन करण्यात आले. नागरिकांची ही कागदपत्रे जमा करून शासकीय शुल्क स्वीकारत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रयत्न फळास लागून समस्याग्रस्त नागरिकांच्या आयुष्यात अमुलाग्र व सकारात्मक बदल घडविणारे हे कार्य तातडीने केले. फेब्रुवारी महिन्यापासून नशिराबादकर नागरिकांना याचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे. रेशनकार्ड व १२ अंकी क्रमांक वाटप कार्यक्रम राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडस, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होळी मैदान खालची आळी येथे संपन्न होत आहे. कधी सर्व नशिराबादकर नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने करण्यात आले आहे.