Home धर्म-समाज यावल तालुक्यात हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणीस प्रारंभ

यावल तालुक्यात हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणीस प्रारंभ

0
55

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन सन् २०२१-२०२२वर्षाच्या रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणीस काल दि. १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

यंदाच्या रब्बी हंगामाच्या उत्पादीत हरभरा या धान्याची केंद्र आणि राज्य शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र यावल ,उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार १६फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, तुर पिकाचा ऑनलाईन चालु खरीप हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा असे आवाहान संस्थेचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे, त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते अशी माहिती वि. का. सोसायटी कोरपावलीचे सचिव मुकुंद वामन तायडे यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound