धरणगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता धरणगाव शहरात विशेष काळजी घेतली जात आहे. हा प्रादुर्भाव शहरात वाढू नये यासाठी दुकानांसाठी व्यापारी असोसिएशनतर्फे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जे दुकानदार याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, युवा नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी व्यापारी असोसिएशनला पाठींबा दर्शविला असून नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार धरणगाव शहरातील दुकाने सोमवार, मंगळवार, शुक्रवार व शनिवार रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यत सुरु राहणार आहेत. तर बुधवार, गुरुवार व रविवार रोजी सर्व दुकाने पूर्ण वेळ बंद असतील तरी सर्व व्यापारी बांधवांनी याची नोंद घ्यावी. ज्या व्यापाऱ्याने दिलेल्या वार व वेळेचे पालन केले नाही तर संबंधित व्यापारी अथवा दुकानदारास २१००/- रुपये दंड आकारला जाणार आहे. यांची नोंद घ्यावे असे आवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे.