उद्यापासून कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्त राज्यव्यापी निदर्शने

बुलढाणा , प्रतिनिधी | महाप्रेषण व महावितरण कंपनीच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने संघटनेने मंगळवार दि, १६ ते १८ नोव्हेंबर २१ तीन दिवस काळ्या फिती लावून काम करत, निदर्शने व द्वारसभेद्वारे निषेध करण्याचे व दि.२२ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचे ठरवले आहे.

 

कामगार संघटना व व्यवस्थापनाचे कामगारांच्या प्रश्नासंबंधात बदली धोरण व बढती संबंधात द्वितक्षीय वाटाघाटीने मान्य केलेल्या तरतुदीचा स्वतः महवितरण कंपनीच्या व्यवस्थापणाने भंग केल्याने तसेच महापारेषण कंपनीत बदली इच्छुक कर्मचारी यांच्या बदल्या न केल्यामुळे त्याचप्रमाणे महानिर्मिती कंपनीत सुध्दा तसेच धोरण अवलंबिल्यामुळे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने संघटनेने मंगळवार दि, १६ ते १८ नोव्हेंबर २१ तीन दिवस काळ्या फिती लावून काम करत, निदर्शने व द्वारसभेद्वारे निषेध करण्याचे व दि.२२ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचे ठरवले आहे.मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबरला मुख्यअभियंता,अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता वितरण/निर्मिती पारेषण कंपन्यांच्या महाराष्ट्रातील कार्यालया समोर दुपारी १.३० वाजता द्वारसभा घेऊन,काळया फिती लावून निषेध करण्यात येणार असून दि.२२ नोव्हेंबर पासून विविध कार्यालय समोर उपोषण सुरू करण्यांत येईल.

मान्य तरतुदीची अंमलबजावणीस नकार

महावितरणच्या व्यवस्थापणाने कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या बदल्या बढती,पती-पत्नी एकत्रीकरण, वैद्यकिय कारण संदर्भात उभयमान्य समजोत्याने प्रशासकिय परिपत्रक ५१४,६०७,१३९,१७२६० नुसार बदली धोरण ठरवून प्रसिद्ध केले.मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास व्यवस्थापणाने नकार दिला आहे व फिल्डवर बदल्या करण्यात येवू नये म्हणून सॅप प्रणालीला लॉक लावलेला आहे.त्यामुळे फिल्डवर इच्छुक कामगार यांच्या बदल्या करता येत नाही.या धोरणामुळे प्रचंड असंतोष कामगारामध्ये निर्माण झालेला आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध पत्राद्वारे वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा,कार्यध्यक्ष सी.एन.देशमुख, सरचिटणीस कृष्णा भोयर,अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव,राज्य उपाध्यक्ष,उपसरचिटणीस व संयुक्त सचिव यांनी दिली आहे.

Protected Content