जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यसभेसाठी जिल्ह्यासह राज्यातील अपक्ष आमदार हे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. जळगाव जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रात यावेळी अपक्ष आणि एमआयएमच्या भूमिका मात्र लक्षणीय ठरणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात ४७ मतदारसंघ आहेत. यात भाजपा १६, राष्ट्रवादी १२, कॉंग्रेस ७, शिवसेना ७, एमआयएम २, आणि अपक्ष ३ असे ४७ आमदार आहेत. यातून पाच आमदारांपैकी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर चे आमदार अपक्ष आणि राष्ट्रवादी पुरस्कृत असले तरी शिवसेनचे आहेत. तर धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या आमदार मंजुषा गावित अपक्ष असल्या तरी शिवसेना समर्थक आहेत. तर नगर मधून शंकरराव गडाख हे कॉंग्रेस समर्थक म्हणून ओळखले जातात. यावेळी नव्यानेच धुळे मध्य आणि मालेगाव मध्य मधून एमआयएम चे दोन आमदार आहेत. त्यामुळे या अपक्ष आणि एमआयएमच्या आमदारांची भूमिका मात्र राज्यसभेसाठी लक्षणीय ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघापैकी जिल्ह्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव, जामनेर, चाळीसगाव आणि भुसावळ असे ४ आमदार भाजपा, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा आणि चोपडा असे ४ आमदार शिवसेना, अमळनेर राष्ट्रवादी आणि यावल काँग्रेस असे प्रत्येकी एक आणि मुक्ताईनगर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (शिवसेनेचे) असे ११ आमदार आहेत. यात राज्यसभेसाठी जिल्ह्यातून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे प्रत्येकी एक एक आणि शिवसेनेचे पाच तर भाजपचे ४ असे मतदान निश्चित आहे. परंतु भुसावळचे आमदार सावकारे हे भाजपमधून निवडून आले असले तरी सुरुवातीपासूनच त्यांची भूमिका मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक म्हणूनच असल्याने ते कोणाला मतदान करणार याची चर्चा आहे.