उत्तर द्यावेच लागेल ; शाह यांचा ममतांना इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला नड्डा यांच्या कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे. अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारला इशाराही दिला आहे.

“आज बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर हल्ला झाला ही खूपच निंदनीय घटना आहे. या घटनेचा कितीही निषेध करावा तरी कमीच आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगालच्या सरकारला आता शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागेल”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं.

दरम्यान, जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचं दिसत आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याचं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. भाजपा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. मी आज केवळ दुर्गादेवीच्या आशीर्वादानेमुळेच बैठकीत पोहोचू शकलो,” असं हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले.

Protected Content