पश्चिम रेल्वेत विविध पदांच्या ३,५५३ जागांसाठी भरती

job 1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांची पदभरती निघाली असून त्यासंदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तब्बल ३,५५३ जागांसाठी ही मेगा भरती निघाली आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.  पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर rrc-wr.com यासंदर्भातची आधिक माहिती तुम्हाला मिळेल. पात्र उमेदवारांकडून आजपासून (दि.७) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे.

वयोमर्यादा :- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १५ आणि कमाल वय २४ वर्ष असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट देण्यात आली आहे.

शैक्षणिक अट :- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची प्रतिष्ठित बोर्डातून ५५ टक्के गुणांसह दहावी पास असावी. तसेच त्याच्याकडे ITI प्रमाणपत्रही बंधनकारक आहे.

प्रवेश शुल्क :- जनरल कॅटेगरीमधील उमेदवारला १०० रूपये शुल्क असेल. तर महिला आणि आरक्षित वर्गाच्या उमेदरांना कोणतेही शुल्क नाही.

Protected Content