जळगाव प्रतिनिधी । जि.प.च्या कृषी पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला म्हाळके यांची सभापती निवड ही चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने याला अवैध ठरवण्या यावे अशी मागणी प्रा. नीलिमा पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
प्रा. निलीमा पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत ६ जानेवारी रोजी सभापतींची निवड झाली होती. यात विषय सभापती क्रमांक दोनचे उमेदवार उज्ज्वला म्हाळके यांनी आपल्या उमेदवारी अर्जात नाव खोडून पुन्हा नवीन नाव लिहिलेले आढळले आहे. यामुळे या अर्जात खाडाखोड झाली असून त्यावर प्रस्तावकांची स्वाक्षरीही नाही. यासह पीठासन अधिकारी यांच्या समोर कोणतेही अभिसाक्षी प्रमाणपत्र म्हाळके यांनी सादर केले नाही. अर्ज भरताना निवडणूक नियमानुसार जि.प. सदस्य म्हणून राजपत्रात उल्लेखित असणे आवश्यक असताना त्यांचे प्रस्तावकहे राजपात्रित जि.प. सदस्य नाहीत. या मुळे सादर केलेले उमेदवारी अर्ज अवैध असल्याची तक्रार या अर्जात करण्यात आली आहे. यावर ११ फेबुवारीला सुनावणी झाली.
दरम्यान, या संदर्भात कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला म्हाळके यांनी निवड प्रक्रिया ही योग्य असून या तक्रारीचा निकाल आपल्या बाजूनेच लागणार असल्याचा दावा केला आहे.