जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ईसाफ ग्रुप ऑफ इंडस्ट्री आणि ईसाफ कॉ-ऑफरेटीव्ह मायक्रो फायनान्स बँकच्या राबविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून १४ महिलांना ब्लँकेटचे नुकतेच वाटप करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील ईसाफ ग्रुप ऑफ इंडस्ट्री आणि ईसाफ कॉ-ऑफरेटीव्ह मायक्रो फायनान्स बँकच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या बचत गटाच्या १४ गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यात बचत गटातील कानळदा येथील ५ तर उमाळे येथील ९ महिलांचा समावेश होता. सीएच क्लारेन्स दास, डीएम वासुदेव मासुळे, डीएम जुबेर पटेल यांच्याहस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक राजू न्हावी, मिलिंद सपकाळे, स्नेहा सूर्यवंशी, सदानंद साठे यांच्यासह आदी उपस्थित होते.