इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थिती खूप चांगली : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्या देशाची लोकसंख्या पाहता, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची परिस्थिती खूप चांगली आहे. भविष्यात कोरोनावर अभ्यास केला जाईल, तेव्हा भारताचा आणि आपल्या एकजुटीचा उल्लेख होईल. आपण को-ऑपरेटिव फेडरलिज्मचे सर्वात चांगले उदाहरण सादर केले, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेंसद्वारे 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करत आहेत. आपल्या 15 मिनीटांच्या ओपनिंग कमेंट्समध्ये मोदींनी कोरोनाविरोधातील लढाईत सरकारच्या उपाययोजना, राज्यांचा सहयोग, कोरोनापासून वाचण्याचे उपाय, लॉकडाउनचा परिणाम, अनलॉक-1 , अर्थव्यवस्था आणि रिफॉर्म्सबाबत माहिती दिली. यावेळी मोदी म्हणाले की, जगातील मोठ-मोठे जानकार आपल्या लॉकडाउन आणि नियमांबाबत चर्चा करत आहेत. देशातील रिकव्हरी रेट 50% पेक्षा जास्त झाला आहे. आता अनलॉक-१ होऊनही दोन आठवडे उलटले आहेत. या काळात आपल्याला आलेले अनुभव भविष्यात उपयोगी ठरतील. आज मला तुमच्याकडून जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती समजली. तुम्ही दिलेल्या सूचना पुढील रणनीती ठरवण्यासाठी उपयोगी पडतील, असे नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून मोठ्याप्रमाणवर भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आले. तर हजारो मजूर आपापल्या गावी परतले. सध्या आपण वाहतुकीची बहुतांश साधने सुरु केली आहेत. मात्र, तरीही जगाच्या इतर भागांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा तितकासा प्रभाव जाणवत नाही, असे यावेळी मोदींनी म्हटले.

Protected Content