इंधन दर वाढल्याने राहुल गांधी संतापले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेस नेते राहुल गांधी  सोशल मीडियावरून मोदी सरकारच्या ध्येय धोरणांवर  परखड मत मांडतात. आता पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरून निशाणा साधला आहे. अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले म्हणून  राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे.

 

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं कारण देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरु’ असं ट्वीट केलं आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती असा हॅशटॅग दिला आहे.

 

 

लॉकडाऊनमुळे व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असल्याने आणखी महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

Protected Content