चाळीसगाव, प्रतिनिधी । देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक बरोबर मानसिक झळ सोसावी लागत आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन रयत सेनेच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले.
कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेचा उत्पन्नाचा स्रोत ठप्प झाले आहे. त्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढ होत असल्याने गरिबांना याची झळ अधिक सोसावी लागत आहे. खरंतर पाच वर्षांपूर्वी गॅसचे दर सरासरी ४०० रुपये, पेट्रोल ७० व डिझेल ५५ ते ६० रुपये असे होते. शिवाय घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडी देखील मिळत होती. मात्र आज मितीस ती सबसिडी देखील केंद सरकारने बंद केल्याने गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूकीचे भाडेवाढ देखील झाली आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूचे दर देखील भडकल्याने गोरगरीब जनतेला दैनंदिन जीवनात मोठ्या समस्येला सामारे जावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात व आगोदर देण्यात येणारी सबसिडी पुन्हा देण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी रयत सेनेच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. दरवाढ कमी न झाल्यास रयत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन रयत सेनेतर्फे करण्यात आला आहे. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, युवक जिल्हाअध्यक्ष आकाश धुमाळ, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे ,छोटू अहिरे, दीपक देशमुख ,शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सचिन नागमोती, रोकडे शाखेचे अध्यक्ष अमोल पाटील, दिलीप पवार, शरद पवार ,मंगेश देठे ,योगेश पाटील आदींच्या सह्या आहे.