धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील इंदिरा कन्या शाळेजवळून ईलेक्ट्रिशीअन तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात बुधवार ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर कैलास माळी (वय-२४, रा. दोंदवाडे ता. जि.धुळे) हा तरुण जळगाव धरणगाव शहरात इलेक्ट्रिकचे काम करतो. किशोर माळी हा कामाच्या निमित्ताने २५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच १८ एफ ३९८) ने धरणगाव आलेला होता. शहर गावातील इंदिरा कन्या शाळेजवळून त्याने दुचाकी पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर किशोर माळी याने परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु काहीही माहिती मिळाली नाही, अखेर बुधवारी ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.