इंडिगो कार उलटून एक जण जागीच ठार

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । मालेगावाहून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या इंडिगोवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाला ही घटना आडगाव शिवारात घडली

 मालेगावाहून चाळीसगावच्या  दिशेने भरधाव वेगाने येत असताना अचानक इंडीगो गाडीवरील (क्र. एम.एच.४७ जी. ७०४४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन डांबरी रस्त्याच्याखाली जाऊन उलटल्याने झालेल्या अपघातात ताहेर युसूफ पटेल (वय-५५,  रा. मालेगाव ) याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. चालक कामरान खान नहीमखान ( रा. दयाणे ता. मालेगाव ) हा गंभीर जखमी झाला आहे. हि घटना रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास आडगावजवळील फौजी हॉटेलसमोर घडली .

 आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात  भादवि कलम- ३०४(अ), २७९, ३३७, २२७ व मोटार अधिनियम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुभाष पाटील करीत आहेत.

 

Protected Content