आ. शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी हवामान मापक यंत्र योग्यजागी उभारण्यास सुरुवात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील बामणोद, मारुळ, डोंगरदे, हरिपुरा या भागात हवामान मापक यंत्र हे अयोग्य ठिकाणी बसविण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. मात्र आ. शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी आता यंत्राची योग्य ठिकाणी उभारण्यास सुरुवात झाली आहे.

यावल तालुक्यातील बामणोद, मारुळ, डोंगरदे, हरिपुरा या भागात हवामान मापक यंत्र हे अयोग्य ठिकाणी बसविण्यात आले होते. त्यांना योग्य ठिकाणी बसविण्यासाठी यावल- रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्याकडे याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांना यश आले आहे. हवामान मापक यंत्रे लोकवस्तीत बसविले गेले होते. त्यामुळे काही अंश थंडीच्या तापमानामुळे पीक विमा योजने पासून तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव हे वंचित राहिले होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोणातुन स्वतः लक्ष घालत तात्काळ हवामान मापक यंत्राची जागा परिसरातील शेतकरी बांधव व अधिकारी वर्ग यांना सोबत घेऊन जागेची पाहणी केली . व योग्य ठिकाणी बसविण्यासाठी एकाच दिवसात विविध ठीकाणी शनिवारी दि. २२ जानेवारी रोजी स्वतः लक्ष देत बांधावर थांबून कामास सुरवात करण्यात आली. विशेष करून शनिवारी जो पर्यत हवामान मापक यंत्र बसत नाही. तोपर्यँत म्हणजे रात्री उशिरापर्यँत आमदार शिरीष चौधरी शेतातील बांधावर थांबले.

यावेळी सुनील फिरके, संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील, सदस्य जावेद अली, जिया उलहक, मारुळ ग्रामपंचायतचे सरपंच असद अहमद जावेद अलीसय्यद, मसरूर आली, बाळू सिताराम पाटील, मती उर रहमान, संजय तायडे, पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, बामणोदचे सरपंच राहुल तायडे, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , विमा कंपनी प्रतीनिधी नितीन पाटील, प्रमोद बोरोले, गोपाळ जावळे, सुनील केदारे,चंद्रकांत तळेले, तौफिक खान, कुंदन कोल्हे, लोमेश बोरोले, सांगवी उपसरपंच विकास धांडे, युवराज भंगाळे, मोहराळा येथील भरत महाजन, वासुदेव पाटील, किरण चौधरी, मुबारक तडवी, डॉ. कोळंबे, भोजराज पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content