आ. लता सोनवणेंच्या प्रयत्नातून चुंचाळे, बोराळे गावासह चोपडा मतदारसंघात विकास कामांचे भूमिपूजन

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज,प्रतिनिधी । राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.

 

आमदार लताताई सोनवणे , माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना सहसंपर्कप्रमुख रावेर लोकसभा मतदारसंघ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाअंतर्गत बोराळे व चुंचाळे, वडोदे, दहिगाव तालुका यावल येथे पेवर ब्लॉक बसवणे. शिरसाड तालुका यावल येथे काँक्रीटीकरण व डांबरीकरण करणे वरील दोन कोटी ८९ लाख रुपये निधीच्या कामांचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी सोनवणे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख योगेश भाऊ, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विनायक आप्पा ,उपसरपंच पराग महाजन, जयंत पाटील, गोकुळ कोळी, समाधान सोनवणे, दिनू साळुंके, भरत राजपूत, प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे, सरपंच वंदना चौधरी, उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य पुनम राजपूत, माजी पोलीस पाटील हिंमत राजपूत, युवराज राजपूत, अशोक वानखेडे, नेहमीचंद राजपूत, सुहास सिंग राजपूत, सुनील पंडित , पुनम संदीप चौधरी, संदीप वानखेडे, सुमित राजपूत, विश्वासराव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास सिंग राजपूत , विनोद चौधरी, आशा राजपूत, संदीप वानखेडे ग्रामसभेच्या बोराडे गावाचे ग्रामपंचायत सदस्य अझर खाटीक, संध्या राजपूत, शीला राजपूत, लताबाई राजपूत, शिरागड पतळीचे सरपंच प्रताप सोनवणे, गोविंद आप्पा यांच्यासह ग्रामस्थ मडंळी सह आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content