उदयनराजे अखेर भाजपमध्ये दाखल

raje shah

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांच्या सस्पेन्सला विराम देत अखेर आज सकाळी उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.

उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. नवी दिल्लीतील या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांची उपस्थिती होती. उदयनराजे यांनी यावेळी मोदी व शहांचे कौतुक केले. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करताहेत. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Protected Content