आ. राहूल कूल यांचे ५०० कोटींचे मनी लॉंड्रींग ! : राऊतांचा आरोप

मुंबई-भाजपचे आमदार राहूल कूल यांनी सुमारे ५०० कोटी रूपयांचे मनी लॉंड्रींग केले असून या प्रकरणी कारवाई करावी अशा मागणीचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यात सनसनाटी आरोप केला आहे. या पत्रात नमूद केले आहे की,  दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचे मनी लॉंडरींग झाले आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींच्या गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, अशी टिका या पत्रातून करण्यात आली आहे.

 

या प्रकरणाची सीबीआय अथवा ईडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे दौंड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चार वेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. तथापि, यावर त्यांनी एक शब्द देखील काढला नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Protected Content