जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर, सिंधी कॉलनी, राठी शाळा, निनाबाई हॉस्पिटल परिसरात रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते रविवारी २१ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
शहरातील राठी शाळा ते सिंधी कॉलनी, संत चोखामेळा ते राठी शाळा, पंचमुखी हनुमान मंदीर ते नानीबाई हॉस्पिटलपर्यंतच्या प्रमख्य रस्त्यांची दयनिय अवस्था झाली होती. आमदार राजूमामा भोळे यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला. या अनुषंगाने रविवारी २१ मे रोजी सकाळी ११ वाजता आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते पंचमुखी हनुमान मंदीर ते नानीबाई हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाटी, मंडळ अध्यक्ष संजय लुल्ला, प्रभागातील नगरसेवक अमित काळे, अॅड.शुचिता हाडा, मंगला चौधरी, धिरज सोनवणे, भगत बालाणी, कुंदन काळे, मनोज आहुजा, संजय चौधरी, प्रकाश बालाणी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येसह उपस्थित होते. सदरचे रस्ते हे जळगाव शहर महानगरपालिकास हद्दीतील मधील रहदारीच्या दृष्टीने महत्वाचे रस्ते असून रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.