मानसी पाटील व वासिमा शेख यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षेच्या निकालात यश संपादन करून जिल्ह्यातील मानसी पाटील व वासिमा शेख यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असून अन्य विद्यार्थ्यांचीही विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात मुलींमधून राज्यात दुसरा क्रमांक जळगाव येथील मानसी सुरेश पाटील, महिला खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रात तिसरा क्रमांक वसिमा शेख हिने पटकविला आहे. या दोघांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. यासोबत अन्य उमेदवारांनीही घवघवीत यश संपादन केले आहे. यात पूनम राणे (पिंपळगाव खुर्द ता. भुसावळ), प्रदीप शेंडगे, अजिंक्य सूर्यवंशी यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विपुल पाटील, आरती पाटील, दिनेश किसन बैसाणे (नायगाव ता. यावल) यांची पोलिस उपअधीक्षक, राहुल ठोंबरे, रूपाली शिरोळे (धुळे) औद्योगिक अधिकारी, मोहनीश शेलवटकर, रेखा वाणी, प्रशांत पाटील, प्रसन्नजित चव्हाण, रुणय जकुलवार, अक्षय ढाकणे, शुभम बहाकर, जीवन मोराणकर (जळगाव) यांची तहसीलदार, दत्ता बोरसे, नितीन हराड, रवी अकुलवार, अनिल पाटील, महेश अनारसे, विक्रांत जाधव, अमोल नरूटे, संदीप हाडगे, निखिल पाटील, महेश देशमुख यांची नायब तहसीलदार, शुभम घुगे कक्षाधिकारी, राम फरकांडे यांची उपशिक्षणाधिकारी या पदांवर निवड झाली आहे.

Protected Content