पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील उंदीरखेडा येथील श्रीक्षेत्र नागेश्वर मंदीर परिसरात पर्यटनाच्या विकासासाठी ३ कोटी मंजुर झाले आहे. याबाबत आमदार पाटीलचे आभार मानले जात आहे.
तालुक्यातील उंदीरखेडा येथे प्राचीन काळापासुन स्थित असलेल्या श्रीक्षेत्र नागेश्वर मंदीर भाविकांचे मोठे श्रध्दास्थान मानले जाते. प्राचीन काळापासुन ते आजपावेतो या मंदीराचा टप्प्या-टप्प्याने विविध माध्यमांकडुन विकास होता गेला. आज हे मंदीर भाविकांचे मोठे श्रध्दास्थान बनले असुन तालुक्यासह खांदेशातुन मोठ्या प्रमाणावर भाविक या मंदीरात येत असतात. हिंदु धर्मानुसार विधी पुजा उदा. काळसर्पदोष, शांती यासारख्या पुजेसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सर्वसामान्य, गोर-गरीब नागरीकांना परवडणार नसल्यामुळे भाविक-भक्त श्रीक्षेत्र नागेश्वर येथेच विधीवत पुजा करत असतात. त्यामुळे या मंदीराची मोठी प्रचिती होत गेली. येथे आलेल्या भाविकांची निवासाची व इतर कार्यक्रमांसाठी जागेची व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत होती.
त्याचअनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांच्या दुरदृष्टीने हे श्रीक्षेत्र पर्यटन व्हावे व येथे आलेल्या नागरीकांची गैरसोय न होता त्यांना येथेच सर्व सुविधायुक्त क्षेत्र तयार व्हावे यासाठी राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री मा.आदीत्यजी ठाकरे साहेब यांचेकडे पत्रान्वये मागणी केली होती. या मागणीचा योग्य तो पाठपुरावा करून आज ११ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्रमांक – टिडीएस २०२१/१२/प्र.क्र.८४२/पर्यटन आदेशान्वये ३ कोटी रूपयाचा पर्यटन विकासाची मंजुरी देत पहिल्या टप्प्यात ९० लक्ष रूपयाचा खर्चाची मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीत संत निवास, आर. ओ. प्रणालीसह पाणी पुरवठा योजना, मंदीर गाभाऱ्याची सुधारणा करणे, विद्युत रोषणाई, महिला व पुरूष स्वतंत्र अत्याधुनिक शौच्छालय, भक्त निवास, सभामंडप यांसह विविध विकासाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात खुप मोठे पर्यटनस्थळ म्हणुन श्रीक्षेत्र नागेश्वर मंदीर आपल्या समोर दिसणार आहे. या कामांना तातडीने सुरू करण्याचा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी संबंधित विभागास दिलेल्या आहे. या निर्णयाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असुन आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब, राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री मा.आदीत्यजी ठाकरे साहेब यांचे आभार मानले आहेत.