पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानमंडळाचा २१ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये आ. चिमणराव पाटील यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणुन निवड करण्यात आली.
आ. चिमणराव पाटील यांची राहूरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत आपली भावना व्यक्त करतांना आ. पाटील यांनी सांगितले की, या संस्थेव्दारे शेती क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी कशी भरीव कामगिरी करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. माझी निवड मला प्रिय असलेल्या क्षेत्रात केल्यामुळे मी करत असलेल्या माझ्या समाजकारणाचा मुळ मुद्दा म्हणजे शेतकरी असल्याने शेतकऱ्यांसह शेती शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी नवऊर्जा प्राप्त होणार आहे. तसेच शेती शिक्षण क्षेत्रात युवकांना आकर्षण होणेसाठी विद्यापीठाचा माध्यमाने सदैव कार्य करणार. तसेच यानिवड बद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत.