पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी | राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे सरकार असतांना भडगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात प्रवेश केल्याने भडगाव भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
भडगाव भाजपाचे व माझे गाव माझे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र तत्तार व अखिल विद्यार्थी परिषद पदाधिकारी नितिन महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकार्यांनी शिवसेना शिंदे गटात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला आहे.
आ. किशोर पाटील यांच्या शिवालय या कार्यालयात भडगाव येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली होती. महेंद्र तत्तार यांच्यासह माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे संचालक सदस्य यांनी आ. किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून घेतला. यावेळी अमोल पाखले, मुन्ना परदेशी, शेख वकार, राहुल देवरे, राहुल माळी, पुंडलिक कुंभार, सौरभ बच्छाव, गोकुळ पाटील, दादु पाटील, अनिल मोरे, अनिल पवार, मंथन दिक्षित, सुशिल महाजन, साकिब खान, तेजस महाजन, भैय्या पुजारी व इतर कार्यकरत्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.