जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना यांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील 30 जून,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. असे आवाहन आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी शुक्रवारी २९ जुलै रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.