जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आसावा नगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख १३ हजारांचे दागिणे लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील आसावा नगरात पुरूषोत्तम नथ्थू वाणी वय ५८ हे राहतात. शुक्रवारी पुरूषोत्तम हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले होते, यादरम्यान चोरटयांनी त्यांचे बंद कराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. व तसेच घरातील सोन्याचे दोन मंगळसूत्र, कानातले, सोन्याचे तुकडे, चांदीचे दोन वाडे, तीन चांदीच्या साखळ्या असे एकूण १ लाख १३ हजारांचे दागिणे चोरुन नेला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पुरुषोत्तम वाणी हे घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले तर घरातील दागिणे चोरुन नेल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शांताराम पाटील हे करीत आहेत.