आसनखेडा येथे सर्पदंशाने एकाचा मृत्यू

पाचोरा, प्रतिनिधी |  तालुक्यातील आसनखेडा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आसनखेडा ता. पाचोरा येथील रहिवाशी प्रभाकर आधार पाटील (वय – ४०) हे शेत मजुरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास राहते घराच्या मागील बाजुस लघुशंकेसाठी गेले असता त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याजवळ एका विषारी सर्पाने दंश केला. सदरचा प्रकार त्यांच्या पुतण्याच्या लक्षात येताच त्यांना लागलीच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी प्रभाकर पाटील यांना मृत घोषित केले. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रभाकर पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई व पत्नी असा परिवार आहे. प्रभाकर पाटील यांचे अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content