मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जितेंद्र आव्हाड यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून याचा राजीनाम्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केला आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आधी विवीयाना मॉलमधील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर काल रात्री त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विविध आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, कायदेशीर मार्गानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी कुणाही दबाव टाकलेला नाही. यामुळे आव्हाडांनी राजीनामा द्यायचा असेल तर नक्कीच द्यावा. मात्र यासाठी कुणाला जबाबदार ठरवू नये असा इशारा देखील त्यांनी दिला.