जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘आर्सेनिक अल्बम ३०’ होमीओपॅथी औषधीचे पॅकींग करण्यात येत आहे. प्रशासनाकडून वितरित करण्यात येणार असलेल्या अर्सेनिक अलब होमिओपॅथी गोळ्या पॅकिंग करण्यास शहरातील एनएसएस, एनसीसी आणि विविध स्वयंसेवक संघाने प्रशासनाला मदत करत आहे. अशी माहिती नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
शहरात औषधाचे मोफत वितरण
‘आर्सेनिक अल्बम ३०’ होमीओपॅथी औषधीचे पॅकिंगचा दुसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५३ हजार बाटल्या तयार केल्या होत्या यासाठी राजपत्रित अधिकारी आणि सामाजिक संस्थेच्या वतीने १ लाख रूपयांची मदत झाली होती. कंन्टेनमेंट झोन, ज्येष्ठ नगरीक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना होमिओपॅथी औषधी वितरीत केलेल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात १ लाख बाटल्यांचे पॅकींग करण्याचे उद्दीष्टे आहे. यासाठी शहरातील इच्छुक एनएसएस, एनसीसी आणि विविध संस्थेचे स्वयंसेवकांच्या मदतीने दोन शिप्टमध्ये पॅकिंगचे काम सुरू आहेत. तसेच नागरिकांनी कोरोनाची परिस्थितील लक्षात घेता लॉकडाऊन उल्लंघन करू नये असेही आवाहन यावेळी नोडल अधिकारी श्री. गाडिलकर यांनी दिली.