नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आर्थिक त्सुनामी येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. पण, देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती. पण, त्यावरून भाजपा आणि माध्यमांनी माझी थट्टा केली होती, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला ट्वीटरवरून फटकारले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यासंबंधी राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. लघु व मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत. मोठंमोठ्या कंपन्या प्रचंड तणावाखाली आहेत. बँकाही संकटात आहेत. कोरोनामुळे आलेले संकट आणि त्यानंतरच्या धोरणांमुळे ५०० बड्या कर्जदार कंपन्यांवर आणखी १ लाख ६७ हजार कोटी रुपयांचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे या आणि पुढील वित्त वर्षात हे खासगी कर्जदार परतफेड करण्यात कूचराई करतील, असे पतमानांकन संस्थेचे म्हणणे आहे. या बाबतचे एक वृत्ताची लिंक शेअर करून राहुल गांधी यांनी मोदी सरकार पुन्हा एकदा टीका केली आहे.