आयशर ट्रक कलांडल्याने मजुराचा मृत्यू

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पुलाचा धापा तुटल्याने विटाने भरलेला आयशर ट्रक कलंडल्याने एक मजुरांचा ट्रक खाली दबून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नेरी गावाजवळ घडली आहे. तर इतर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तिघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्याम कुमार तुलसीराम पाठे (वय-३४, रा. अजिंठा ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथून आयशर क्रमांक (एमएच  ०४ डीडी ७७०९) हा गुरुवार १८ जानेवारी रोजी विटा भरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथे जात होता. दरम्यान  सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळून जात असताना रस्त्यावरील फुलाचा धापा तुटल्याने अचानक आयशर ट्रकचे चाक फसले. त्यातच ट्रक हा कलंडला गेला. यामध्ये श्यामकुमार तुलसीराम पाठे हा तरुण दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले सुनील भड्या कोठोडे वय-३३, शेख शकील शेख सलीम (वय-३२), आणि सलमान खान युसुफ खान सर्व रा. अजिंठा जि. छत्रपती संभाजीनगर असे तीन जण जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमी झालेल्या तिघांना तातडीने खाजगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Protected Content