मुंबई प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून आता ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणार आहे.
येत्या २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, कोरोनामुळे ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्राने देखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता आणि स्पर्धा घेणार असाल तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारचे म्हणणे होते. मात्र नंतर ही स्पर्धा रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर, ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणार असल्याची माहिती बीसीसीआयतर्फे जाहीर करण्यात आली आहे.