आयएमएच्या महिला सदस्यांचे निरामय आरोग्यासाठी ट्रेकिंग

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते या संकल्पनेतून आयएमएच्या महिला डॉक्टर्स यांनी मोहाडी टेकडीवर ट्रेकिंग करत संकल्पना प्रत्यक्षात उतरवून समाजापुढे एक उत्तम आदर्श ठेवला आहे.

 

आय.एम.ए.जळगावच्या महिला डॉक्टर्स जिल्हा सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे ,अध्यक्ष डॉ.दीपक आठवले यांनी महिला डॉक्टरांसाठी मोहाडी येथील टेकडीवर पहाटे ट्रेकिंगचे आयोजन केले. आय.एम.ए.स्पोर्ट विंगचे सचिव डॉ. मनीष चौधरी,अध्यक्षा डॉ.वृषाली पाटील यांनी या ट्रेकचे नियोजन केले. सूर्योदयापूर्वीच सुरू झालेल्या या ट्रेकमध्ये सुमारे ७५ महिला डॉक्टरांनी जळगाव शहरातून मोहाडीपर्यंत पायी जात आपला सहभाग नोंदविला. मोहाडीच्या टेकडीवर गेल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सर्वांनी सूर्यनमस्कार करीत व्यायामाचे महत्व पटवून सांगितले. दर रविवारी आरोग्य उपयोगी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील असे आयोजकांनी सांगितले. ट्रेक नंतर लांडोरखोरी उद्यानासमोरील डॉ.कीर्ती देशमुख यांचे नियोजित फार्महाऊसवर डॉ. गीतांजली लाठी यांच्या मदतीने गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते.

Protected Content